बँकेविषयी -
१९१९ च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर 'मुन्सिपल शिक्षक सह पतपेढी लि.अहमदनगर 'या संस्थे चा जन्म होऊन तिच्या जन्माची नोंद २० सप्टे१९१९ अशी राजदरबारी झाली .हाच आजच्या आमच्या या भाग्य शाली प्राथमिक शिक्षक सह. बँकेचा जन्मदिवस होय .या हिरकणीच्या जनकत्वाचा मान ज्या महान व्यक्तीला मिळाला ती थोर आणि काळाची पावले ओळखणारी द्रशटी व्यक्ती म्हणजे कै.चिंतामण केशव वाळिंबे हे होत .यांच्या साथीला त्यांच्या सह मित्रांचा परिवारही तितकाच तोलामोलाचा व कर्तुत्वाचा होता .या संस्थेच्या जन्काबरोबर या १५ पालकांची नावेही संस्थेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनीच नमूद करावी लागतील .
संस्थेच्या प्रथम कार्यकारिणीतील हे १५ सदस्य संस्थेचे आद्य संस्थापक कै.चिंतामण केशव वाळिंबे यांच्याबरोबर कार्यरत होते.
1) रा. श्री. कुलकर्णी2) धो. ग. धोपे3 ) धो. गो. देवचक्के 4) ब. रा. शिंदे 5) र. व. मनेळ 6) बा. श्री. गोसावी 7) त्र. भी. बडवे 8) वा. गो. मुळे 9) को. ना. वाळवेकर 10) ग. स. चिने 11) स. ना. भणगे 12) ग. को. देशमुख 13) की. वा. जोशी 14) ची. रा. जोशी 15) ग. कृ. चितळे हे होत.
महत्वाचे टप्पे -
- १९६९ साली पतसंस्थेचे बँकेत रूपांतर.
- १९८७ साली बँकिंग लायसन्स मिळाले.
- प्रत्येक तालुका ठिकाणी शाखा.
- ७ तालुक्यात माफक दरात लॉकर सुविधा.
- RTGS / NEFT सुविधा.
- CTS चेक सुविधा.
- ATM सुविधा.